रेल्वेच्या धडकेने एकाचा मृत्यू

| कोलाड | वार्ताहर |

रोहा तालुक्यातील गोवे आदिवासीवाडी येथील दौलत रामू वाघमारे हा गोवे गावाच्या हद्दीत शनिवार, दि. 7 सप्टेंबर रोजी चार वाजण्याच्या सुमारास गोवे गावाच्या हद्दीतील रेल्वे ट्रकच्या बाजूला बकर्‍या चरण्यासाठी गेला होता. दरम्यान, रोहा बाजूकडून कोलाड बाजूकडे जाणार्‍या मालगाडीने त्याला जोरदार धडक दिली. या अपघातात त्याच्या डोक्याला मोठी दुखापत झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आबा गायकवाड अधिक तपशील तपास करीत आहेत.

Exit mobile version