। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल शहराजवळील गांधी हॉस्पिटल समोरील उड्डाणपुलाखाली अज्ञात कारणावरून एका व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना सोमवारी (दि.16) मध्यरात्री घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
पनवेल शहराजवळील गांधी हॉस्पिटल समोरील उड्डाणपुलाखाली विजय (पूर्ण नाव माहित नाही) अंदाजे वय 37-38 वर्षे हा नेहमी त्या ठिकाणी नाका कामगार येथे कामासाठी उभा राहत असे व प्रामुख्याने कॅटरिंगची पडेल ती कामे करत असे, तसेच त्याला देशी दारू पिण्याचे व्यसन होते. सोमवारी रात्री अज्ञात कारणावरून अज्ञात व्यक्तीने त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची निघृण हत्या केली व तेथून तो पसार झाला आहे. या घटनेची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ पोलीस उपयुक्त प्रशांत मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांना माहिती दिली तसेच वपोनि नितीन ठाकरे यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, या हत्येमागील कारणाचा अधिक तपास करत आहेत.
डोक्यात दगड घालून एकाची हत्या
