| पनवेल | प्रतिनिधी |
ट्रकच्या धडकेने एका मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना पनवेलजवळील जेएनपीटीकडून हायवेने पनवेल बाजूकडे येत असताना गव्हाण फाट्याजवळ विदेशी हॉटेलसमोर घडली आहे. भाऊ कुणाल इंगळे (24, रा. नावडे कॉलनी) असे या मयत इसमाचे नाव आहे. ते होंडा शाईन मोटारसायकलने जात असताना गव्हाण फाट्याजवळ पनवेल लेनवर विदेशी हॉटेलसमोर आलेल्या ट्रकने रहदारीच्या विरुद्ध दिशेने येऊन त्याच्याकडील वाहन हयगयीने व रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवून जोरात धडक दिली. या अपघातात भाऊ कुणाल इंगळे हे गंभीररित्या जखमी होऊन मयत झाले आहेत. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.





