। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यात आंबेड बुद्रुक येथे दोन मोटारसायकलची धडक झाल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक 29 वर्षीय युवक जागीच ठार झाला, तर दोन जण जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी सायंकाळी 7.30 वाजता घडला. याबाबत संगमेश्वर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात विश्रुत सत्यन नायर (वय-29) हा जागीच ठार झाला आहे. तसेच क्सिस मोटारसायकलवरील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रत्नागिरी येथे दाखल करण्यात आलं आहे. या अपघातातील मृत झालेला नायर हा मूळचा केरळमधील असून तो बँक आँफ इंडियाच्या संगमेश्वर शाखेतील कर्मचारी आहे.







