| गडब | वार्ताहर |
पेण वाशी रस्त्यावरून भाल गावाकडे जाणाऱ्या कारचालकाचे वेगावरील नियंत्रण सुटल्याने कार पेण वाशी प्राथमिक केंद्रानजीकच्या झाडावर आदळली. घडलेल्या अपघातात संतोष म्हात्रे ( वय 39, रा. भाल तामसी बंदर ) यांचा मृत्यू झाला.
तर कारचालक प्रसाद शिवदे (वय 46, रा. आंबेपुर पेझारी) व अन्य सहकारी विश्वास पाटील ( वय 59, रा. ढोलपाडा, पेझारी) हे जखमी झाले आहेत. जखमीना संजिवनी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर कार जळुन खाक झाली आहे. या अपघाताची नोंद वडखळ पोलिस ठाण्यात करण्यात आली असून सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजित पाटील अधिक तपास करीत आहेत.