। माणगाव । सलीम शेख ।
माणगावपासून 2 किमी अंतरावर खरवली गावच्या हद्दीत ओपन अम्ब्रेला हॉटेलच्या मागे गोवा बाजूकडून मुंबईकडे जाणार्या कोणत्यातरी कोकण रेल्वेच्या धडकेने एका 47 वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.12)रात्री 1 वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबतची माहिती पोलीस शिपाई सुरक्षा बल आऊट पोस्ट कोलाड प्रवीण दिनेश सोनुने (वय 31) मुळ रा.चांडलो जि.बुलढाणा सध्या रा.वरसगाव ता.रोहा यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार खरवली गावच्या हद्दीत गोवा बाजूकडून मुंबईकडे जाणार्या कोकण रेल्वने भिवा (भीमसेन) गोविंद जाधव (वय-47) रा.कळमजे आदिवासीवाडी ता.माणगाव हे रेल्वे ट्रॅकवर आल्याने त्यांना धडक दिली.
या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच माणगाव तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेचो नोंद माणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक अस्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रावसाहेब कोळेकर करीत आहेत.