| खोपोली | वार्ताहर |
लोणावळा येथून सिमेंटचे खांब खोपोलीत घेऊन येणार्या टेम्पोला बोरघाटात अपघात झाला. यामध्ये एक ठार, तर दोघे जखमी झाले. हा अपघात काळी 11 वा.च्या सुमारास घडला.
टेम्पोमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वजन असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि तो पलटी झाला. या अपघातात अमोल (पूर्ण नाव माहित नाही) हा मयत झाला, तर टेम्पोचालक आकाश बळीराम खळगे, इसाक मुसा शेख 28 दोघेही (रा. भोसरी) हे जखमी झाले. त्यांना प्रथम खोपोली पालिकेच्या आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारांसाठी एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे हलविण्यात आले आहे. देवदूत यंत्रणा व बोरघाट वाहतूक पोलिस, खोपोली पोलिसांनी महामार्ग मोकळा केल्यावर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरु झाली.