दुचाकी अपघातात एक ठार

| रसायनी | वार्ताहर |

मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद हद्दीतील लोधिवली गावाजवळ एका दुचाकीस्वराला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला आहे.

मुंबईहून प्रदीप भागूजी लागोत (वय 30, रा.अंबुखेड) हे आपल्या ताब्यातील डीओ कंपनीची दुचाकी घेऊन गावी जात असताना ते जुन्या महामार्गावरील दांडफाटा लोधिवली समुद्र महल बारजवळ आले असता त्यांना पाठमागून अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात ते दुचाकीसह दोघेजण बाजूच्या नाल्यात जाऊन पडले. त्यातील पाठीमागे बसलेला अतुल धोंडिबा बच्चे (वय 34) हे गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला, तर एक जखमी झाला आहे.

Exit mobile version