अज्ञात कारणावरून धारदार हत्याराने एकाची हत्या

। पनवेल । प्रतिनिधी ।
अज्ञात कारणावरून एका इसमाची धारदार हत्याराने गळ्यावर वार करून व तोंडावर मारहाण करून निघृण हत्या करण्यात आल्याची घटना नवीन पनवेल सेक्टर 18 विठ्ठल रुख्मिणी मंदिराच्या पाठीमागे घडली.

मिळालेल्या माहितीनूसार, फारुक फकीर अहमद ब्यापारी (वय 22,रा. पोदी नंबर 2 नवीन पनवेल) हा मजूरी काम करत होता. त्याची कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून धारदार हत्याराने हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच खांदेश्‍वर पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले होते. त्याच्या कुटुंबीयांनी दिलेल्या व गुप्त बातमीदारांच्या माहितीनुसार काही संशयितांचा शोध खांदेश्‍वर पोलीस करत आहेत.

Exit mobile version