वंचित घटकांना दहा लाख कपडे दान करणार

सामाजिक बांधिलकी जपत ‘रेमंड’चा संकल्प
पनवेल | वार्ताहर |
नवी मुंबई (पनवेल) कापड आणि वस्त्रप्रावरणे यांचे उत्पादन व विक्री या व्यवसायात भारतात अग्रगण्य असलेल्या रेमंड या कंपनीने गूंज या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने ‘लूक गुड, डू गुड’ (चांगले दिसा, चांगले करा) हा सामाजिक उपक्रम सुरू केला आहे.

हा एक प्रकारचा कपड्यांची याचा कार्यक्रम आहे. त्यामध्ये ‘कामाची प्रतिष्ठा’ या विषयावर भर देण्यात येत आहे. भारतभरात 600 हून अधिक शहरांतील रेमंड स्टोअरमध्ये तसेच www.myraymond.com या वेबसाईटवर ऑनलाईन स्वरुपात हा उपक्रम राबविला जाईल. सध्या सुरू असलेल्या कोव्हिड साथीच्या पार्श्‍वभूमीवर, ग्राहक आपले जुने कपडे उचलून देण्यासाठी अपॉईंटमेंटकरिता नोंदणी करू शकतात आणि ‘रेमंड होम असिस्ट’ या सुविधेद्वारे टेलरिंग सेवेची अपॉइंटमेंट मिळवू शकतात. या सेवेतून ग्राहक आपल्या घरात बसून शर्ट, पँट यांची शिलाई करवून घेऊ शकतात किंवा अपॉईंटमेंट घेऊन दुकानातही जाऊ शकतात.

आपल्या जुन्या कपड्यांचे दान करून कोणतीही व्यक्ती ‘रेमंड फॅब्रिक्स’साठी विनामूल्य शिलाई सेवा मिळवू शकेल किंवा गिफ्ट व्हाऊचर्स मिळवू शकेल. ही व्हाऊचर्स ऑनलाइन वटवली जाऊ शकतात किंवा या उपक्रमात सहभागी असलेल्या ‘रेमंड स्टोअर’मध्ये प्रत्यक्ष जाऊन तेथे तयार कपडे घेण्यासाठी ती वापरली जाऊ शकतात. याव्यतिरिक्त, वैयक्तिकृत कपडे घेऊ इच्छिणारे ग्राहक ‘रेमंड मेड टू मेजर स्टोअर’मध्ये व्हाऊचर वटवू शकतात.

कोव्हिड साथीच्या काळात असे उपक्रम राबविणे अतिशय महत्त्वाचे व गरजेचे आहे, असे आम्ही रेमंडमध्ये मानतो. या उपक्रमाद्वारे ग्राहकांपर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचणे, त्यांना कपड्यांच्या विनिमय कार्यक्रमात भाग घेण्यास प्रोत्साहित करणे आणि त्यांचे जुने कपडे दान करण्यात योगदान देण्याचे आमचे ध्येय आहे.
गणेश कुमार, मुख्य कार्यान्वयन अधिकारी, रेमंड


व्यावसायिकांना दिलासा
रेमंडने ‘गूंज’च्या माध्यमातून दहा लाखांहून अधिक कपडे दान करण्याचा संकल्प सोडला आहे. गूंज ही स्वयंसेवी संस्था शहरांतील नागरिकांच्या निरुपयोगी वस्तूंचा उपयोग दारिद्र्य निर्मूलनासाठी करते आणि जगभरातील वंचित नागरिकांची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी काम करते. रेमंडच्या लूक गुड, डू गुड या सामाजिक उपक्रमामुळे कोव्हिड व टाळेबंदीने ग्रासलेल्या शिलाई व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. हा उपक्रम 16 जुलैपासून सुरू झाला असून, 31 ऑगस्टपर्यंत तो भारतभरातील रेमंडच्या सर्व स्टोअर्समध्ये आणि www.myraymond.com वर सुरू राहणार आहे.

Exit mobile version