। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियांच्या दोन नव्या योजनांचा शुभारंभ केला आहे. यामध्ये रिटेल डायरेक्ट योजना आणि रिझर्व्ह बँक एकात्मिक लोकपाल योजना यांचा समावेश आहे.
‘एक राष्ट्र-एक लोकपाल’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित असणार्या या योजनेचा उद्देश तक्रार निवारण प्रणालीमध्ये आणखी सुधारणा करणे हा आहे. या योजनेअंतर्गत एक पोर्टल, एक ई-मेल आणि एक पत्ता असेल जेथे ग्राहक त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतात. ग्राहक त्यांच्या तक्रारी सबमिट करू शकतात, कागदपत्रे सबमिट करू शकतात, त्यांच्या तक्रारी, कागदपत्रांच्या स्थितीचा मागोवा घेऊ शकतात आणि अभिप्राय देऊ शकतात.
तर वन नेशन-वन ओम्बड्समन या संकल्पनेवर आधारित रिटेल डायरेक्ट स्कीम अंतर्गत किरकोळ गुंतवणूकदार सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक करू शकतील. यामुळे भारत सरकार आणि राज्य सरकारांनी जारी केलेल्या सिक्युरिटीजमध्ये थेट गुंतवणूक करण्याचा एक नवीन मार्ग उपलब्ध होणार आहे.
किरकोळ गुंतवणूकदारांना ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे सरकारी सिक्युरिटीज मार्केटमध्ये प्राथमिक आणि दुय्यम अशा दोन्ही सुलभ प्रवेश प्रदान करणे हा यामागील उद्देश आहे.