| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील जांभुळपाडा येथील आदिवासी वाडीवर दोन व्यक्तींमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर थेट खुनात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चाकूहल्ल्यात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून, पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास जांभुळपाडा येथील वाडीवर दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपीने चाकूने वार केल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच उरण पोलीस ठाणे येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतल्याचे समजते. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
उरणमध्ये चाकूहल्ल्यात एकाचा खून
