जनरल स्टोअसमधून पाऊण किलो गांजा जप्त

। पुणे । वृत्तसंस्था ।
पुणे-पानशेत रस्त्यावरील गोर्‍हे खुर्द गावच्या हद्दीत मुख्य रस्त्याला लागून असलेल्या शौर्य जनरल स्टोअर्स या दुकानावर छापा टाकून हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांच्या पथकाने पाऊण किलो वजणाचा गांजाजप्त केला आहे. याप्रकरणी वैभव विठ्ठल वणवे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांनी पदभार स्वीकारल्यापासून धडक कारवाईला सुरुवात केली आहे. एका गुन्ह्याच्या तपासासाठी जात असताना भाऊसाहेब ढोले यांना गोर्‍हे गावच्या हद्दीत एका दुकानातून गांजाची विक्री होत असल्याबाबत खबर मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार कारवाई करण्यासाठी हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम, हवेली पोलीस ठाण्यातील इतर पोलीस कर्मचारी व पंचांसह ढोले यांच्या पथकाने दुकानावर छापा टाकला.
शोर्य जनरल स्टोअर्स या दुकानात झडती घेतल्यानंतर पोलीसांना छोट्या-छोट्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरलेला 798 ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला.

Exit mobile version