| माणगाव | प्रतिनिधी |
आविष्कार फाऊंडेशन कोल्हापूर या सामाजिक संस्थेकडून खोतवाडी येथील सावित्रीबाई जोतिबा फुले वाचनालयास 1086 पुस्तके सोमवारी (दि. 20) प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई जोंतिबा फुले यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. प्रमुख उपस्थिती व मान्यवरांचे सन्मानचिन्ह, पुस्तक व पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. निलेश पाटील यांनी केले.
दरम्यान, अजित रणदिवे व महेश गुरवळ यांनी वाचनालयाचे कार्य व पश्चिम पन्हाळा भागातील ख्याती याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी संजय पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना हरवत चाललेली वाचन संस्कृती जपण्याचा व स्पर्धेच्या युगामध्ये नवनवीन आव्हाने स्वीकारण्याचा सल्ला दिला. ध्येय, चिकाटी व मेहनतीशिवाय पर्याय नाही हा संदेश त्यांनी आपल्या मनोगततून व्यक्त केला. दरम्यान, एक लाख 56 हजार रुपयांची 1056 पुस्तके वाचनालयासाठी सुपूर्द केली. यामध्ये शालेय पुस्तके, कथा, कादंबरी, ग्रंथ, काव्यसंग्रह, आत्मचरित्र अशी विविध पुस्तक पुस्तकांचा या मध्ये समावेश आहे. कार्यक्रमाचे आभार जयदीप अतिग्रे यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी गावचे प्रथम नागरिक अमर रणदिवे, आविष्कार फाऊंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष व संस्थापक संजय पवार, विक्रम पाटील, अजित रणदिवे, महेश गुरवळ, आनंदा यादव, सरदार खोत, यश खोत व वाचनालयाचे विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.