एका सिलिंडरसाठी मोजावे लागणार हजार रूपये

। मुंबई । प्रतिनिधी ।
एकीकडे सीएनजी, पीएनजी आणि आता एलपीजीच्या गॅस दरात वाढ करण्यात आली आहे. देशाला सगळीकडूनच महागाईच्या झळा लागत असतानाच एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल या सगळ्याच्या दरात वाढ झालेली असताना आता पुन्हा एकदा सामान्यांच्या खिशाला कात्री लावत घरगुती सिलिंडरच्या दरात 50 रूपयांची वाढ करण्यात आली आहे. पन्नास रूपयांच्या वाढीमुळे घरगुती सिलिंडर आता 999.50 रूपये झाला असून आता इथून पुढे एका सिलिंडरसाठी हजार रूपये मोजावे लागणार आहेत.

Exit mobile version