। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
ॐ नादब्रम्ह भजन मंडळ कुरुळच्या वतीने ऑनलाईन अभंगवाणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी व्हीडीओ पाठवण्याची अंतिम तारिख 20 जुलै 2021 असून निकाल 5 ऑगस्ट 2021 रोजी जाहीर करण्यात येतील.
स्पर्धेत सहभागी होण्याकरिता वैयक्तिक किंवा मंडळाचे नाव नोंदणी करणे बंधनकारक असून स्पर्धेसाठी निवडलेला अभंग हा वारकरी सांप्रदायातील असावा. (भावगीत, भक्तीगीत, पद, नाट्यगीत, गवळण ग्राह्य धरले जाणार नाही). सादरीकरणासाठी कमीत कमी 5 व जास्तीत जास्त 7 मिनीट वेळ असेल.
अभंग सादर करण्यापूर्वी स्पर्धकाचे नाव, मंडळाचे नाव, अभंगाचे नाव सांगुन सुरुवात करावी. अभंग सादर करताना हॉरमोनियम, तबला, पखवाज, झांज यांचा वापर असावा. तसेच, कराओके ट्रॅकवरील अभंग ग्राह्य धरला जाणार नाही. कमीत कमी 4 व जास्तीत जास्त 6 माणसांचा सहभाग असावा. युट्यूब लिंक, स्टेज वरचे सादरिकरण, स्टुडिओ मधील रेकॉर्डींग चालणार नाही. ऑडीओ व व्हिडीओ एडिट केलेला नसावा. व्हिडीओ करताना मोबाईल आडवा धरावा. स्पर्धेचा निकाल 30 टक्केुट्यूब, व्ह्यूव, लाईक्स व कमेंटवर अवलंबून असेल आणि 70 टक्के निकाल परिक्षकांवर अवलंबून असेल.
परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील. स्पर्धेत फेर बदल करण्याचे अधिकार अयोजकांकडे राहतील. स्पर्धेसाठी नोंदणी शुल्क जमा झाल्याची खात्री झाल्यावर आपली नोंदणिनिश्चित केली जाईल. अभंग सादरीकरण केलेला व्हीडीओ गूगल पे किंवा फोन पे केलेल्या क्रमांकावर व्हॉटसअॅप करावा. प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात येईल. स्पर्धेसाठी 100 रुपये नोंदणी शुल्क आहे. पुढील क्रमांकावर मोंदणी शुल्क गूगल पे करावे- स्वप्निल वाळंज- 9209846694/ विराज म्हात्रे 9823831246






