। मंडणगड । प्रतिनिधी ।
मंडणगड येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान पदवी महाविद्यालय व कर्मवीर भि. रा. तथा दादा इदाते वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शैक्षणिक वर्षे 2025-26 करिता इयत्ता 11 वी वाणिज्य व विज्ञान, बी. ए., बी. कॉम. व बी. एस्सी. प्रथम वर्ष अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन सुरु करण्यात आली आहे.
या महाविद्यालयामध्ये आवश्यक त्या सर्व शैक्षणिक सोयीसुविधा विद्यार्थ्यांकरीता उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. तसेच विद्यार्थ्याच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाकरीता दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात. दिनांक 13 जूनपासून महाविद्यालयातील नियमित तासिका सुरु होणार आहेत. यावर्षी इयत्ता 11 वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने असल्याने प्रवेश प्रक्रिया माहिती घेण्यासाठी महाविद्यालयात विद्यार्थ्यानी संपर्क साधावा तसेच तालुका परिसरातील इयत्ता 10वी व इयत्ता 12वी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी त्वरीत प्रवेश घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ.राहूल जाधव यांनी केले आहे. तसेच अधिक माहितीसाठी 9423877117, 8793358663 येथे संपर्क साधवा.