महिलेची ऑनलाईन फसवणूक

| पनवेल | वार्ताहर |

एका महिलेला बोलण्यात गुंतवून तीन लाख नऊ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

करंजाडे, सेक्टर 4 येथे राहणार्‍या गीता नाईक या फेसबुक पाहत असताना त्यांना ड्रायफ्रूट सुकामेवा नावाने पोस्ट आली. त्यांनी दिलेल्या व्हाट्स अपनंबरवर हाय केले असता अनोळखी व्यक्तीने ड्रायफ्रूट्सबाबत सविस्तर माहिती दिली. त्यावेळी त्यांनी दोन हजार 345 रुपयांचे ड्रायफ्रूट्स घेण्याचे ठरवले. रक्कम कशी पाठवू असे विचारले असता गुगल पे करण्यास सांगितले. ती रक्कम त्यांनी पाठवली. त्यानंतर दुसर्‍या नंबर वरून कॉल आला व ऑर्डर केलेला ड्रायफ्रूट्स मर्चंटने होल्ड केले असून तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील त्यासाठी गुगल पे द्वारे 21 रुपये पाठवण्यात सांगितले. त्यांनी 21 रुपये पाठवले. त्यानंतर त्या व्यक्तीने 22 रुपये पाठवले. पुन्हा कॉल करून गुगल पे वर जा आणि पैसे पाठवतो त्या ठिकाणी एक कोड टाकून त्यापुढे पाच अंक टाका आणि ती रक्कम पाठवा, असे सांगितले. त्यामुळे 22 हजार 345 रक्कम त्या व्यक्तीला पाठवली. असे करता करता एकूण तीन लाख नऊ हजार 337 रुपये समोरील व्यक्तीच्या अकाउंटमध्ये गेले. यावेळी सदर महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पनवेल शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Exit mobile version