कर्जतमध्ये ऑनलाईन फसवणूक

। कर्जत । वार्ताहर ।
कर्जत पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 2 सप्टेंबर रोजी कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादी रा.सांगवी पो.कोंदीवडे यांच्यावरील मोबाईल नंबरवर घरभाडे भरल्याचा मेसेज करुन तो मेसेज दुसर्‍या क्रमांकावर पाठविण्यास सांगितल्यावर फिर्यादीच्या खात्यातून परस्पर 89 हजाराची रक्कम काढून ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे गु.र.नं.235/2021 भा.दं.वि.क.420 सह आय.टी.अ‍ॅक्ट 66 (क) (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास कर्जत पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुवर्णा पत्की मॅडम या करीत आहेत.

Exit mobile version