| पनवेल | वार्ताहर |
एका 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची एका कंपनीकडून 1 लाख 16 हजाराची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना नवीन पनवेल येथे घडली आहे. घर विक्रीसाठी एका संकेतस्थळावर जाहिरात देण्यासाठी 5 हजार रुपये भरले होते. ती रक्कम परत मिळविण्यसाठी 67 वर्षीय उत्पलकुमार सामंता यांनी हे संकेतस्थळ तपासत असताना त्यांना संबंधित युवतीचा फोन आला व तीने सामंता यांना मोबाईलवरील वेगवेगळे नंबर दाबायला सांगून त्यांच्या बँक खात्यातून 1 लाख 16 हजार रुपये इतर खात्यात वळते केले. याबाबत आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.