ऑनलाईन फसवणूक

। पनवेल । वार्ताहर ।
एका इसमाची 1 लाख 88 हजार रुपयाची फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली आहे. सुशिल शिंदे (43) यांच्या मोबाईल फोनवर एका अनोळखी इसमाचा फोन येऊन त्याने तुमचे रिवॉर्ड पॉईंट जमा झाले असून ते तुम्ही रिडींग करून घ्या असे खोटे सांगून त्यांच्या क्रेडीट कार्डची सर्व माहिती घेवून त्यानंतर त्याने बँकेच्या खोट्या साईटवर जाण्यास सांगून त्यांच्या सर्व माहितीच्या आधारे क्रेडीट कार्डवरुन त्यांच्या संमतीशिवाय त्यांच्या खात्यातील 1 लाख 88 हजार रुपये ट्रान्सफर करून त्यांची ऑनलाईन फसवणूक केल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Exit mobile version