कोमसापतर्फे ऑनलाईन कविसंमेलन

| कोर्लई | वार्ताहर |

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या तळा शाखेतर्फे आषाढी एकादशीनिमित्ताने महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य रायगडभूषण प्रा. एल.बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन कविसंमेलन संपन्न झाले.

प्रास्ताविकात कोमसाप तळा शाखा अध्यक्ष हेमंत बारटक्के यांनी उपस्थित कवींचे स्वागत केले. या कविसंमेलनात पंढरीची वारी, माझा देव व विठ्ठल भक्ती या विषयावर 21 कवींनी आपल्या स्वरचित उत्तम रचना सादर केल्या. अध्यक्षीय भाषणात रायगडभूषण प्रा. एल.बी.पाटील यांनी सांगितले की, जरी आज आपण प्रत्यक्ष वारीत सहभागी नसलो, तरी आपल्या भक्तीमय रचनांनी आपण सर्वांनी पांडुरंगाला आळवून त्याच्यापर्यंत पोहचलो आहोत. यावेळी त्यांनी आपली कविता सादर करुन सर्वांना मंत्रमुग्ध केले.

या कविसंमेलनात नारायण पानावकर, किरण केळुसकर, शिल्पा मोहिते, मंदाकिनी हांडे, प्रतीक्षा नगरकर, रघुनाथ पोवार, उषा खोत, संजय होळकर, नैनिता कर्णिक, प्रज्ञा मराठे, सिद्धेश लखमदे, अनिता कांबळे, सत्यवान घाडी, प्रज्ञा म्हात्रे, संजना जुवाटकर, अजित शेडगे, संगीता नाचपल्ले यांनी कवितांच्या माध्यमातून विठुरायाच्या नामाचा गजर केला. या कविसंमेलनाचे आभार प्रणय इंगळे यांनी मानले.

Exit mobile version