जिल्ह्यात एक कोरोना रुग्ण 8 कोरोना मुक्त

पनवेल मनपासह 14 तालुक्यात नवीन रुग्ण नाही
जिल्हा प्रशासनाची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात बुधवार दि. 23 मार्च रोजी कोरोनाच्या एका नव्या रुग्णाची नोंद झाली असून सुदैवाने उपचारादरम्यान एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याने दिलासा मिळाला आहे. तर पनवेल मनपा सह 14 तालुक्यात एकाही नवीन रुग्णाची नोंद झालेली नाही. तसेच दिवसभरात 8 रुग्ण कोरोनामुक्त झाले अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

फक्त पेण तालुक्यात आढळलेला एक रूग्ण वगळता पनवेल मनपासह 14 तालुक्यात एकाही नवीन रुग्णाची नोंद झालेली नाही. आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 15 हजार 297 झाली आहे. यापैकी 2 लाख 10 हजार 540 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 698 वर गेला आहे. सद्यस्थितीत 59 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

Exit mobile version