जिल्ह्यात शेकापक्षच प्रबळ; माजी आ. पंडित पाटील यांचा विश्‍वास

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
तालुक्यातील पोयनाड विभागात शेतकरी कामगार पक्ष हा प्रबळच आहे. इथला कार्यकर्ता पक्षासोबत ठाम आहे. दोन वर्षांनी पक्षाचा वर्धापन दिन मोठया उत्साहात साजरा होत आहे. या अमृतमहोत्सवी वर्षातील सोहळ्याला पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून जिल्ह्यात पक्षाची ताकद दाखवून द्या असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार पंडित पाटील यांनी केले.

शेतकरी कामगार पक्षाच्या 2 ऑगस्टला वडखळ येथे होणार्‍या अमृतमहोत्सवी वर्धापनदिनाच्या निमित्ताने शेकाप चिटणीस मंडळाचे दौरे सुरु असून, गुरुवारी अलिबाग तालुक्यातील खारेपाट विभागात माजी आमदार पंडित पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोयनाड येथील ना.ना.पाटील हायस्कूल येथे शेकाप कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या सभापती चित्रा पाटील, जिल्हा परिषद सदस्या भावना पाटील, युवा नेते सवाई पाटील, माजी सभापती सुधीर थळे, आदी उपस्थितीत होते. यावेळी कोपर, कुरकुंडी, चरी, शहापूर, पेझारी, आंबेपूर येथील कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

या बैठकीमुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. वर्धापन दिनानिमीत्त गावोगावी होत असलेल्या संपर्क बैठकांमुळे लोकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. जिल्हा परिषदेच्या माजी सभापती चित्रा पाटील यांनी मार्गदर्शन करताना वर्धापन दिनाला कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहून पोयनाड आणि खारेपाट विभागाची ताकद दाखवून दया असे आवाहन त्यांनी केले. घरातून निघताना आपल्या वाहनाना लाल बावटा लावून या असेही आवाहनही त्यांनी केले आहे. शेकाप कार्यकर्त्यांची पुढील बैठक शुक्रवारी 22 जुलैला सकाळी 10 वाजता बांधण येथील विजय पाटील यांच्या निवासस्थानी बांधन,सोमवार बाजार येथील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत..सकाळी 11 वाजता कोलघर येथील शैलेश पाटील यांच्या निवासस्थानी ताडवागळे कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.तर सांबरी येथील संदीप पाटील यांच्या निवासस्थानी दुपारी 12 वाजता कुर्डूस ग्रामपंचायत हद्दीतील कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली जाणार आहे. शनिवार दि. 23 जुलै दुपारी 3 वाजता सारळ हायस्कुल येथे शहापूर जि.प.मतदार संघातील शहापूर, चरी, कुरकुंडी, कोपर हा भाग सोडून अन्य मतदार संघातील कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. या बैठकांना कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे,असे आवाहन करण्यात आले आहे

Exit mobile version