। धाटाव । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहती अंतर्गत रस्त्यालगत असलेल्या महावितरण कंपनीच्या विद्युत रोहीत्रच्या एकाही डीपीला ना कडी ना कुलूप अशा आशयाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर लगेचच महावितरण विभागाच्या माध्यमातून सबंधित कामाला सुरुवात झाली. खडबडून जागे झालेल्या महावितरण विभागाच्या कर्मचारी वर्गाने अवघ्या दोनच दिवसात काही डीबिला दरवाजे तर कड्या बसवील्या आहेत. दरम्यानच्या कामात कर्मचारी वर्ग व अधिकारी वर्गाने कार्यतत्परता दाखविल्याबद्दल महाविरण कंपनीचे नागरिक व कामगार वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
उघड्या डीबीचे दरवाजे बंद
