महसूल अधिकार्याचे दुर्लक्ष
। पनवेल । वार्ताहर ।
खारघर खाडी पात्रातून बेसुमार रेती उपसा केली जात असल्याचे चित्र दिसत असताना महसूल विभागाकडून बेकायदा रेती उत्खननाकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे पर्यावरणप्रेमी नाराजी व्यक्त करीत आहेत.
खारघर मधील काही पर्यावरण प्रेमींनी खारघर खाडीची पाहणी केली. खुले काम रेती उत्खनन होत असूनही महसूल विभाग अधिकार्यांकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. महसूल विभाग अधिकार्यांच्या सहकार्याशिवाय रेती माफिया खुले काम रेती उत्खनन करण्याचे धाडस करु शकत नाहीत, असे पर्यावरण प्रेमींनी सांगितले. पनवेल तहसील विभागाकडून खारघर खाडीमध्ये बेकायदा रेती उत्खनन करणार्या व्यक्तींवर कडक कारवाई करुन खारघर मध्ये होणारे रेती उत्खनन बंद करावे, अशी मागणी पर्यावरण अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.