| म्हसळा | वार्ताहर |
तालुक्यातील बाणकोट खाडीच्या परिसरात आंबेत नवीवाडी (विचारे वाडी) गावात खारफुटीची खुलेआम कत्तल करण्यात येत आहे. याकडे वनविभागाचे सपशेल दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. याबाबत प्रांताधिकारी डॉ. दीपा भोसले यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे.
आंबेत खाडी पट्टा हा गौणखनीज रेती, दगड अन्य व्यवसायाचा मोठा अड्डा असल्याचे बोलले जात असून, याठिकाणी अनधिकृतपणे अनेक गैरधंदे सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. असे असतानाही शासकीय यंत्रणेला हे दिसत नसल्याबद्दल ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. म्हसळा महसूल विभागाचे याप्रश्नी दुर्लक्ष होत असल्याची चर्चा जनतेत खुलेआम सुरू आहे.







