। अहमदाबाद । वृत्तसंस्था ।
हैदराबादविरोधात अहमदाबाद येथे सुरु असलेल्या सामन्यात गुजरातच्या ताफ्यात दोन बदल करण्यात आले. स्पेन्सर जॉनसन याच्या जागी विदर्भाच्या दर्शन नळकांडे याला गुजरातने स्थान दिले आहे. दर्शन नळकांडे याला 2018 मध्ये पंजाब किंग्स संघाने विकत घतले होते. पण त्याला प्लेईँग 11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. पण गुजरातने दर्शन याला खेळण्याची संधी दिली आहे.
विदर्भाचा वेगवान गोलंदाज दर्शन नळकांडे याला गुजरात टायटन्सने 2022 च्या लिलावात 20 लाख रुपयांच्या मूळ किंमतीत विकत घेतले होते. 2022 च्या हंगामात गुजरातकडून दर्शन याने आयपीएलमध्ये पदार्पण केले. आतापर्यंत त्याला फक्त तीन सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती. यामध्ये त्याने तीन विकेट घेतल्या आहेत. 2019 मध्ये दर्शन याने हिमाचलप्रदेशविरोधात विदर्भाकडून टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आतापर्यंत देशांतर्गत क्रिकेटमध्ये दर्शन याने आपल्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केले आहे.
दर्शनची आतापर्यंतची कामगिरी दर्शन हा अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजीसोबत फलंदाजीमध्येही आपले योगदान देतो. विशेषकरुन शेवटच्या शटकांमध्ये चांगली फलंदाजीही करतो. दर्शनने ममुश्ताक अली टी -20फ स्पर्धेत चार चेंडूत चार बळी घेतले होते. असा पराक्रम करणारा तो भारताचा दुसरा तर जगातला नववा गोलंदाज ठरला होता. गेल्यावर्षी मुश्ताक अली करंडक टी-20 स्पर्धेत दर्शननं 13 बळी घेत टॉप 5 मध्ये स्थान पटकावले. गेल्या तीन वर्षांपासून दर्शन मुश्ताक अली करंडक टी-20 स्पर्धेत टॉप 5 मध्ये आहे. या स्पर्धेत तीन वर्षांत दर्शनच्या नावावर 40 विकेट्सची नोंद.