पॉस्को कंपनीचा मुठभर पुढार्‍यांना फायदा – विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा आरोप

| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव तालुक्यातील विळेभागाड परीसरात आलेल्या पॉस्को कंपनीचा फायदा स्थानिकांना नव्हे तर येथील मुठभर पुढार्‍यांना व त्यांच्या मुलांना तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांना झाला आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर माणगाव येथे बोलताना केला.

विळेभागाड एमआयडीसी प्रकल्पग्रस्त स्थानिक भूमीपुत्रांवर झालेल्या अन्यायाबाबत भागाड सरपंच प्रकाश जंगम , विळे वरचीवाडी सरपंच परशुराम कोदे,माणगाव तालुका अवजड वाहतूक सेनेचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर उतेकर , एस.पी.लाँजीस्टिकचे प्रोप्रायटर संतोष पोलेकर यांनी माणगाव पोलिस ठाण्याजवळ आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणस्थळी विधान परीषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी भेट देऊन स्थानिक भूमीपुत्रांच्या पाठीशी भाजप राहील असे सांगितले. यावेळी रविभाऊ मुंढे, संजय ढवळे,नाना महाळे,सुरेंद्र साळी, प्राजक्ता शुक्ला शर्मिला सत्वे, यशोधरा गोडबोले, उमेश साटम, बाबुराव चव्हाण, संजय जाधव, राजु मुंढे उपस्थित होते. प्रविण दरेकर यांच्यावर विश्‍वास दाखवीत उपोषणकर्ते यांनी दरेकर यांच्याहस्ते सरबत पिऊन उपोषण सोडले.

Exit mobile version