पंकज तांबेंनी घेतली वडेट्टीवार यांची सदिच्छा भेट
| माणगाव | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था झाली असून, या महामार्गाचे काम ठेकेदारामार्फत सुरू आहे. मात्र या कामाला म्हणावी तितकी गती नाही. अनेक ठिकाणी या मार्गाचे काम थांबले आहे. मोऱ्या, ब्रिज, उड्डाण पूल, भुयारी मार्ग, बायपास यासारखे अनेक कामे बाकी आहेत. त्यातच या मार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. या मार्गाची पाहणी करुन सरकारदरबारी प्रश्न लावून धरावा, यासाठी जिल्हा उपाध्यक्ष पंकज तांबेंनी विरोधी पक्षनेते वडेट्टीवर यांची भेट घेतली. दरम्यान, गणेशोत्सवापूर्वी महामार्गावरील खड्डे तात्काळ बुजवावेत यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधणार असल्याचे श्री. तांबे यांनी सांगितले. यावेळी श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचे माजी आ. शाम सावंत यावेळी उपस्थित होते.
यावेळी दक्षिण रायगड मधील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या समस्या तसेच पक्षबांधणी, आगामी येऊ घातलेल्या निवडणुकांसंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच ना. वडेट्टीवार यांची विधानसभा विरोधी पक्ष नेते पदी निवड झाली त्याबाबत त्यांना श्री. तांबे यांनी पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या. त्यावेळी विरोधी पक्ष नेते ना. वडेट्टीवार यांनी आपण लवकरच मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करून सरकारला रखडलेल्या महामार्गाबाबत जाब विचार असल्याचे सांगितले.