| नाशिक | वृत्तसंस्था |
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ संपत आली. तरीही अद्याप अनेक ठिकाणी उमेदवार ठरत नसल्याचे दिसत आहे. महायुती असो की महाविकास आघाडी जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम आहे. तर काही ठिकाणी उमेदवार स्थानिक कार्यकर्ते उमेदवाराला विरोध करत आहेत. नाशिक लोकसभा मतदार संघातून महायुतीतर्फे मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. मात्र, छगन भुजबळ यांच्या नाशिकमधून लढण्याला कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला आहे.
मंत्री छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यास त्यांचा मतदार संघ असलेल्या येवल्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. भुजबळ यांनी येवल्याचेच प्रतिनिधित्व करण्याच्या भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत. नाशिक लोकसभा मतदार संघातून महायुतीतर्फे मंत्री छगन भुजबळ यांच्या नाव आघाडीवर आहे. मात्र, भुजबळ यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यास त्यांचा मतदार संघ असलेल्या येवल्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. भुजबळ गेल्या 20 वर्षांपासून येवल्याचे प्रतिनिधित्व करीत असून पुढे ही त्यांनी येवल्याचे प्रतिनिधित्व करावे अशा भावना भुजबळ समर्थकांनी व्यक्त केल्या आहे.