ड्रोन सर्व्हेला नैना प्रकल्पबाधित शेतकरी उत्कर्ष समितीचा विरोध


| नवीन पनवेल | वार्ताहर |
ड्रोनद्वारे होणार्‍या मूळ गावठाणच्या सर्व्हेला नैना प्रकल्पबाधित शेतकरी उत्कर्ष समितीने विरोध दर्शविला आहे. याबाबतचे निवेदन समितीने जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, भूमी अभिलेख, तहसीलदार, बीडीओ यांना दिले आहे.
पनवेल तालुक्यातील 138 गावांतील मूळ गावठाणाची ड्रोनद्वारे सर्व्हे करण्यात येत आहे. परंतु, या सर्व्हेबाबत स्थानिक रहिवासी यांना कुठलीही माहिती दिलेली नाही; परंतु स्वातंत्र्य काळापासून वाढती लोकसंख्या यांचा विचार करून शासनाने विस्तारीत गावठाण दिलेला नाही. म्हणून स्थानिक रहिवासी शेतकरी यांनी गावठाणाबाहेर व शेतावर आपल्या उदरनिर्वाहासाठी घरे, गोठे, चाळी, बिल्डीग बांधलेल्या आहेत. तसेच गावालगत असलेली गुरचरण व फॉरेस्ट या जागा स्वतंत्र काळापासून रहिवासी शेतकरी या जागेमध्ये गुरे, शेळ्या, मेंढ्या चरण्यासाठी व अनेक नैसर्गिक गरजा भागविण्यासाठी याचा वापर पिढ्यान्पिढ्या करत आहेत.
तरी, या संबंधित शासन व प्रशासन यांनी अगोदर सविस्तर माहिती देणे गरजेचे आहे, असे समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. परंतु, तसे न करता ड्रोनद्वारे सर्वे करत आहात. त्याला आमचा विरोध असल्याचे समितीने म्हटले आहे. तरी मूळ गावठाणाबाहेरची घरे, चाळी, बिल्डींग त्यांना कसे सामावून घेणार आहात याचा अगोदर खुलासा करणे गरजेचे आहे व गुरचरण, फॉरेस्ट या जागा विस्तारीत गावठाणासाठी मिळाव्यात व सर्व्हेला तात्काळ स्थगिती देण्यात यावी. अन्यथा स्थानिक रहिवासी, शेतकरी, व्यावसायिक हे आंदोलन करतील, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

Exit mobile version