पर्यावरणापेक्षा राजकीय हेतूनं मेट्रोला विरोध – देवेंद्र फडणवीस

। मुंबई । वृत्तसंस्था ।

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो 3 च्या चाचणीला हिरवा झेंडा दाखवला. मुंबईकरांच्या हितासाठी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. मेट्रो 3 ही मुंबईची नवीन लाईफलाईन असणार आहे, असं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. मेट्रो लाईन 3 ही कुलाबा – वांद्रे – सिप्झ अशी असणार आहे. सारीपूतनगर येथील ट्रॅकवर या चाचणीला सुरुवात झाली आहे.

मेट्रोचा वाद निर्माण झाल्यामुळे मेट्रो सुरु होण्याला विलंब होणार आहे. पर्यावरणापेक्षा राजकीय हेतूनं मेट्रोला विरोध झाला, असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे.

आधीच्या सरकारने समिती नेमली होती, त्याचा अहवाल येईपर्यंत कॉस्ट सुद्धा वाढली आहे. मात्र आता मुंबई मेट्रो धावण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही. पुढच्या वर्षी डिसेंबरपर्यंत मेट्रोचा एक टप्पा सुरु होईल. त्यानंतर लगेच मेट्रो पूर्ण क्षमतेनं सुरु होईल. 20 हजार कोंटींचा हा प्रकल्प लवकरच पूर्ण होईल. अश्विनी भिडे आणि टीमनं यासाठी अहोरात्र मेहनत केली आहे, त्याबद्दल संपूर्ण टीमचा अभिनंदन, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे

Exit mobile version