पनवेल महापालिकेच्या डम्पींग ग्राऊंडला विरोध

गांवठाणाला जागा देण्याची ग्रामस्थांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी
। अलिबाग । वार्ताहर ।
पनवेल तालुक्यांतील खानांव हे गांव एक नवीन शहर म्हणून उदयास येत असताना गावच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता गावासाठी आवश्यक असणारे गांवठाणचा शिल्लक नाही. खांनाव ग्रामस्थांच्या ताबा कब्जात असलेली सर्व्हे नं. 83 अ, क्षेत्र 22 हेक्टर व सर्व्ह 114, क्षेत्र 11 हेक्टर अशी एकुण 33 हेक्टर गुरूचरणाची ग्रामस्थांच्या हक्कांची जागा आहे ती जागा खानांव गांवच्या ग्रामस्थांना विस्तारीत गांवठाणासाठी देण्याची मागणी खानांव गांवठाण आणि ग्रामविकास समिती यांनी जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे निवेदनाव्दारे केली असून सदरचे निवेदन तहसिलदार महसुल विशाल दौडकर यांच्याकडे दिले. निवेदन कर्त्यांनी निवेदनामध्ये पुढे अशीही मागणी केली आहे की, गावातील सुशिक्षित तरूण तरूणी यांना घरांसाठी जागेची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे गावासाठी शाळा,कॉलेज,किडांगण,तलाव,गार्डन,समाजमंदिर,पार्कीग,वयोवृध्दांसाठी विरंगुळा केंद्र, भाजी मार्केट यासाठी जागेची आवश्यकता आहे.वाढत्या शहरीकरणामुळे शेती संपत आहे.स्वयंरोजगार आणि छोटया व्यवसायांसाठी जागेची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमुद केले आहे.गावाच्या हक्कांच्या गुरूचरणाची जागा पनवेल नगरपालिका डंम्पींग ग्राऊंडसाठी वापर करण्याला ग्रामस्थांचा विरोध असल्याचे निवेदन कर्त्यांनी म्हटले आहे. अगोदर खानाव गावच्या गावठाणाचा प्रश्‍नमार्गी लावावा. पनवेल महानगर पालिकेस गावच्या हक्काचा भुखंड दिल्यास ग्रामस्थ अकमक पवित्रा घेवुन मैदानातील व कोर्टातील लढाई लढतील असा इशारा ग्रामस्थांनी दिलेला आहे.

Exit mobile version