। नेरळ । वार्ताहर ।
देशाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त आझादी का अमृत महोत्सव निमित्त सर्वत्र हर घर झेंडा हर घर तिरंगा अभियान राबविले जात आहे. त्यानिमित्ताने माथेरान नगरपरिषद यांच्या शिक्षण मंडळाच्या वीर हुतात्मा भाई कोतवाल माध्यमिक शाळेत वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती. वक्तृत्व स्पर्धेत 20 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता अशी माहिती लक्ष्मण जाणू ढेबे यांनी दिली. तर स्पर्धेचे नियोजन शाळेतील शिक्षक आहिरे, भोईर, पाटील, चाटसे यांनी केले होतें. तर स्पर्धेतील विजेत्यांना आझादी का अमृत महोत्सव निमित्त आयोजित कार्यक्रमात सन्मानित केले जाणार आहे.