भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन

| पेण | प्रतिनिधी |

पेण तालुक्यातील पाटणेश्वर येथे शिवशंभो क्रीडा मंडळातर्फे भव्य जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा दि.18 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता सुरू होणार आहे. या स्पर्धेत विविध भागांतील कबड्डी संघांचा सहभाग अपेक्षित असून, खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची मोठी संधी मिळणार आहे. आयोजकांनी सर्व क्रिडाप्रेमींना व नागरिकांना मोठया संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले आहे.

या स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली असून, प्रथम क्रमांकासाठी 33,333 रूपये व चषक, द्वितीय क्रमांकासाठी 22,222 रूपये व चषक, तृतीय क्रमांक व चतुर्थ क्रमांकासाठी 11,111 रूपये व चषक देण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट खेळाडू रोख रक्कम 5,555, उत्कृष्ट चढाई रोख रक्कम 3,333, उत्कृष्ट पकड रोख रक्कम 3,333 आणि पब्लिक हिरो रोख रक्कम 3,333 असे देखील विशेष पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेसाठी प्रवेश फी ही 1 हजार रुपये असणार आहे. मात्र, संध्याकाळी 5 वाजल्यानंतर प्रवेश घेणाऱ्या संघासाठी 1500 रुपये प्रवेश फी ठेवण्यात आली आहे.

Exit mobile version