| पनवेल | प्रतिनिधी |
स्त्री शक्ती फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य आणि एम.जी.एम. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य ‘महाआरोग्य शिबीर’ आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर मंगळवार दि.16 ते बुधवार दि.17 डिसेंबर यादिवशी सकाळी 10 ते दुपारी 2 यावेळेत समाज मंदिर, कळंबोली प्लॉट क्र. 1, सेक्टर-5 ई येथे आयोजित करण्यात आले आहे. मोफत आरोग्य तपासणीसह, सरकारच्या महत्वाच्या योजना मोफत कार्डासह जसे की, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना हे याशिबिराचे वैशिट्य आहे. या शिबिरांतर्गत सर्वसाधारण आरोग्य तपासणी, बालरोग तपासणी, कान-नाक-घसा तपासणी, त्वचारोग तपासणी, स्त्रीरोग तपासणी, डोळ्यांची तपासणी, हाडांच्या व्याधी तपासणी, दंत चिकित्सा यासारख्या तपासण्या होणार आहेत. शिबिरात सहभागी होताना आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत. नागरिकांनी या आरोग्य उपक्रमाचा लाभ घ्यावा व आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन विजया चंद्रकांत कदम यांनी केले आहे.







