अपघातग्रस्तांसाठी आधार चषकाचे आयोजन

| उरण | वार्ताहर |

उरण तालुक्यात अनेक अपघात होत असतात, त्यात अनेकांचे प्राण गेले आहेत. अशावेळी गोरगरिबांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते. त्यासाठी उरण तालुक्यातील पूर्व विभागातील अपघातग्रस्तसाठी निधी उपलब्ध व्हावा या दृष्टीकोणातून न्हावा शेवा सीएचए आधार सामाजिक संस्थेतर्फे दरवर्षी सीएचए आधार चषकाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी रविवारी (दि.11) मायमाऊली अक्कादेवी मैदान मोठीजुई-उरण येथे एक दिवसीय सीएचए आधार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करणारी न्हावा शेवा सीएचए आधार सामाजिक संस्था ही महाराष्ट्रातील एकमेव संघटना आहे. क्रिकेट क्षेत्रात या न्हावा शेवा सीएचए आधार सामाजिक संस्थेने एक नवा आदर्श समाजासमोर, खेळाडूंसमोर, क्रीडा रसिक प्रेषकांसमोर उभा केला आहे. या आधार चषकाला रसिक प्रेषक, खेळाडूंनी, विविध प्रतिष्ठित मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन न्हावा शेवा सीएचए आधार सामाजिक संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

Exit mobile version