महिलांसाठी भोंडल्यांचे आयोजन

| नेरळ | वार्ताहर |

नेरळ गावातील श्री अंबामाता मंदिर येथे महिलांसाठी भोंडला आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना महिला आघाडी यांच्या वतीने करण्यात आले होते. याप्रसंगी आयोजित भोंडला कार्यक्रमात महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते, त्यात नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. भोंडला कार्यक्रमासाठी आयोजक महिला शहर शाखा यांच्या वतीने प्रथम क्रमांक जागृती ठमके व्दितीय क्रमांक काजळ गुप्ता, तुतीय क्रमांक आवडी पारधी या ठरल्या. विजेत्यांना प्रसाद थोरवे यांचे हस्ते पारितोषिक देण्यात आली. तर महाभोंडलामधील सर्वात लांब आणि मोठा उखाणा घेणाऱ्या 70 वर्षीय आजी शकुंतला बोरगे यांना मीना थोरवे यांच्या हस्ते पैठणी भेट देण्यात आली.

या कार्यक्रमासाठी कर्जत पंचायत समितीच्या माजी सदस्य मीना थोरवे, मनीषा थोरवे, मनीषा भासे, सुरेखा शितोळे, रेश्मा म्हात्रे, आरती भगत, सायली सिहांसने, भारती शिंदे, जानव्ही साळुंखे, उषा पारधी, छाया पाटील, जयश्री मानकामे, वर्षा बोराडे, उमा खडे, गीतांजली देशमुख, सचिव अंकुश दाभणे, प्रभाकर देशमुख, पंढरीनाथ चंचे, किसन शिंदे,आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version