| पाली/गोमाशी | प्रतिनिधी |
भगवान आदिनाथ दिंगबर जैन प्रतिष्ठान बदलापूर यांच्यावतीने रविवारी (दि. 8) कात्रप बदलापूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
‘जगा आणि जगू द्या’ या प्रतिष्ठानच्या ब्रीद वाक्यानुसार ‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ असे समजले जाते. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये रक्तपेढ्यांना रक्तसाठा कमी पडू लागला आहे. तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने आदिनाथ दिगंबर जैन प्रतिष्ठान बदलापूर यांच्यातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
रक्तदान ही आजच्या काळाची गरज आहे. बर्याच रुग्णांना वेळेवर रक्त न मिळाल्यामुळे आपले प्राण गमवावे लागते. त्यामुळे तरुणाईने अधिकाधिक रक्तदान करण्याचे आवाहन केले. शिबिरात जवळपास 40 रक्तदात्यानी स्वयंम स्फुर्तीने रक्तदान केले. सामान्य जनतेस हा मदतीचा हात मिळावा, या अनुषंगाने हा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.सदर शिबिरासाठी चिदानंद चॅरिटेबल ब्लड बँक चे सहकार्य मिळाले. यावेळी दिगंबर जैन प्रतिष्ठानचे प्रीतम शहा, महावीर दरुरे, योगेश ठोले, नवीन हेमावत, चंचलकुमार पंचोरी इत्यादी जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.