| अलिबाग । प्रतिनिधी ।
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा रुग्णालय अलिबागच्या माध्यमातून तंबाखूजन्य पदार्थांचे दुष्परिणाम यावर विविध स्पर्धांचे आयोजन आयओसो मानांकन प्राप्त डिजिटल आदर्श शाळा पेझारी येथे करण्यात आले. तंबाखू नियंत्रण कक्षाचे समाज सेवक सुशील साईकर, गिरीश म्हात्रे आणि राजिप केंद्र शाळा पेझारीचे नितेश पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. साईकर यांनी तंबाखू सेवनामुळे होणारे दुष्परिणाम कोणते होतात याची माहिती दिली. यावेळी उपस्थित यांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक नितिष पाटील यांनी केले.आभार मोहन पाटील यांनी मानले.