| माणगांव | वार्ताहर |
आर. झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल व उम्मते मुस्लीमा कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने ईद-ए-मिलादुन नबीनिमित्त बुधवार दि.18 रोजी सकाळी 10 ते 2 यावेळेत शासकीय विश्रामगृह, जुने माणगाव ता. माणगाव येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तरी या शिबिराचा फायदा गरीब, गरजू जनतेने अवश्य घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. माणगावमधील मुस्लिम समाज बांधवांनी आपण समाजाचे काहीतरी देणेकरी लागतो हा उद्देश नजरेसमोर ठेवून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून या शिबिराचे आयोजन केले आहे. सदर शिबिरात येणाऱ्या गरीब, गरजू रुग्णांनी आपली नावनोंदणी सरफराज अ़फवारे मोबा- 9850608032, फहद करबेलकर मोबा- 9130211141, गुलजार खान मोबा- 8446399577, शादाब गैबी मोबा- 8975916006 यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन कमिटीतर्फे बशिर करेल, इम्रान धवलारकर, इरफान हाजिते, इस्माईल पालेकर, मन्सुर मुकादम, नदीम परदेशी, मुस्तूफा वाडेकर, रफिक जामदार, सीराज अ़फवारे, सुहेब परदेशी, शाहनू अत्तार, अफाक दांडेकर, आमिर नदाफ व सहकाऱ्यांनी केले आहे.