। पनवेल । वार्ताहर ।
नील हॉस्पिटल येथे रविवारी (दि.19) मोफत गर्भसंस्कार शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी अनेक गर्भवती महिलांनी या गर्भसंस्कार शिबीराचा लाभ घेतला.
स्त्रीरोग व गर्भ संस्कार तज्ञ बीके डॉ.शुभदा नील यांनी गर्भवती महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले व मेडिटेशन करवून घेतले. यामुळे गर्भवती महिलांचा ताणतणाव दूर होउन त्या आनंदी राहण्यास मदत होते. गर्भवती माता व बाळ स्वस्थ, खुश राहतात. रोज गर्भवती महिलांनी व्यायाम, प्राणायाम व मेडिटेशन करावे जेणे करून नॉर्मल डिलिव्हरी होण्यास मदत होते, असे वक्तव्य त्यांनी केले. बाळ चरित्रवान, बुद्धिवान व गुणवान होण्यासाठी सुद्धा त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या मोफत गर्भसंस्कार शिबिराचा लाभ जास्तीत जास्त गर्भवती महिलांनी घ्यावा, असे आवाहन डॉ. शुभदा नील यांनी केले आहे.