धनगर समाजाच्यावतीने आरोग्य शिबिराचे आयोजन

| माथेरान | वार्ताहर |

धनगर समाज, एस.एम.बी.टी. हॉस्पिटल आणि अल अन्सार मेडिकल वेल्फेअर सोसायटी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने येथील असेंब्ली हॉलच्या प्रांगणात सकाळी अकरा वाजता धनगर समाज अध्यक्ष दीपेश ढेबे यांच्या अध्यक्षतेखाली मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्ध पुतळ्याला नगरपरिषद प्रशासक तथा कार्यक्षम मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते बिलाल महाबळे हे देखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला बिलाल महाबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर उपस्थित शिवसेनेचे उबाठा गटाचे शहरप्रमुख कुलदीप जाधव, भाजपचे माजी अध्यक्ष विलास पाटील, नगरपरिषद कार्यालय अधीक्षक अंकुश इचके, रायगड जिल्हा धनगर समाज अध्यक्ष संतोष आखाडे,सुनीता आखाडे, लता ढेबे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी समाजाच्या वतीने सर्व उपस्थित मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

धनगर समाजाचे माजी अध्यक्ष राकेश कोकळे यांनी अनेकदा येथील स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबविले असून, अध्यक्ष दीपेश ढेबे यांनाही वेळोवेळी सहकार्य करून समाजासाठी, गावासाठी महत्वपूर्ण योगदान देत आहेत. आरोग्य शिबिरासारखे चांगले कार्य करत आहेत हा एक स्तुत्य उपक्रम आहे. नगरपरिषदेच्या माध्यमातून जी काही लोकाभिमुख कामांसाठी मदत अपेक्षित असेल त्यासाठी आम्ही निश्चितच सहकार्य करू, असे आश्वासन राहुल इंगळे यांनी दिले.

Exit mobile version