पीएनपीत कबड्डी स्पर्धेचे आयोजन

| अलिबाग । वार्ताहर ।
जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून बुधवार, (दि.14) पी.एन.पी. महाविद्यालय वेश्‍वी अलिबाग येथील क्रीडांगणावर जिल्हा प्रशासनामार्फत आयोजित आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या तांत्रिक सहकार्याने कबड्डी चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या कबड्डी चषक स्पर्धेत जिल्हा वरिष्ठ गट कबड्डी निवड चाचणी स्पर्धेतील प्रथम 16 पुरुष संघ आणि प्रथम 8 महिला संघ सहभागी होतील. कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन दि.14 डिसेंबर रोजी सकाळी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते होणार असून त्याच दिवशी संध्याकाळी या क्रीडा स्पर्धेचे पारितोषिक वितरण होणार आहे. या स्पर्धेतील प्रावीण्य प्राप्त संघांना (प्रथम, द्वितीय आणि तृतीय) चषक, प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. तरी या कबड्डी चषक स्पर्धेचा आनंद सर्व कबड्डी प्रेमी आणि क्रीडाप्रेमी नागरिकांनी घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

Exit mobile version