मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन

। नवी मुंबई । प्रतिनिधी ।

विजय नाहटा फाऊडेशन आणि महिला विकास मंचच्यावतीने सीबीडी येथील वारकरी भवनमध्ये महिलांसाठी मंगळागौर या विशेष कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना उपनेते विजय नाहटा, उपजिल्हा प्रमुख रोहिदास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते.

यावेळी शेकडो महिलांनी मंगळागौरच्या कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. उत्कृष्ट नृत्य, पारंपरिक गायन व विविध प्रकारच्या कला सादर करणार्‍यांना प्रथम, द्वितीय, तृतीय आणि दोन उत्तेजनार्थ अशा विजेत्या महिलांना उपनेते विजय नाहटा यांच्या हस्ते पैठणी साडी, प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच सहभागी महिलांना गृहोपयोगी वस्तू आणि सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.

शिवसेना नवी मुंबई महिला जिल्हा संघटक सरोज पाटील, उपजिल्हा संघटक मथुरा पाटील आणि जयश्री भिवडे यांनी कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनश्री भिवडे, सोनाली कदम, मीना पाटील, तेजस्विनी कोळी, दीक्षा गायकवाड आदी महिलांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version