| मुरूड-जंजिरा | प्रतिनिधी |
मुरूड तालुक्यातील खारआंबोली येथे 17 ते 20 जानेवारीपर्यंत श्री माऊली, श्री ज्ञानोबाराय, श्री तुकोबाराय नामसंकीर्तन सोहळ्याचे आयोजन ग्रामस्थ मंडळी, महिला मंडळ खारआंबोली यांचे सौजन्याने श्री हनुमान मंदिर पटांगण खारआंबोली येथे आयोजीत करण्यात आले आहे.
बुधवार (दि.17) 5.30 वाजता काकड आरतीने प्रारंभ होईल. या दिवशी अंकेश पाटील प्रवचन, सायंकाळी सामुदायिक हरिपाठ, रात्री अमृता स्वामी यांचे कीर्तन, राकेश म्हात्रे प्रवचन, योगिराज गोसावी यांचे कीर्तन. दि.19 रोजी दिंडी प्रदक्षिणा, हरिपाठ, रात्री दिनेश गोसावी यांचे कीर्तन. दि.20 रोजी कार्यक्रमाची सांगता होणार आहे.