। पाली/बेणसे । वार्ताहर ।
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे आणि शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांची शासनाने सोडवणूक करावी. याकरिता महाराष्ट्र राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी बुधवारी (दि.25) जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. शाळा आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी हे आंदोलन असून आम्हाला सर्व पालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सुधागड तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांच्या पदाधिकार्यांनी केले आहे.