सुरक्षा अभियान बैठकीचे आयोजन

। पेण । प्रतिनिधी ।

पेण तालुक्यातील शाळा सुरक्षा अभियाना अंतर्गत शाळांच्या मुख्याध्यापकांची व प्रतिनिधींची बैठक उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा गांधी वाचनालयात संपन्न झाली.

यावेळी मुख्याध्यापक व शिक्षकांना मार्गदर्शन करताना फडतरे यांनी शासन आदेशाची आठवण करून देत शाळा सुरक्षा अभियान नक्की काय आहे, या अभियाना अंतर्गत मुख्याध्यापक व शिक्षकांनी कोणकोणत्या गोष्टींचे काटेकोर पालन करायचा आहे, या बाबींच्या सुचना देण्यात आल्या. तसेच, शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे व शिक्षकेतर कर्मचारी यांचे चारित्र पडताळून घेणे, महिला कर्मचार्‍यांची नेमणूक करणे, या सुचना देऊन सुरक्षतेच्या दृष्टीने सतर्क राहण्याचे सांगितले. यावेळी पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे व संदीप बागुल आदींने मार्गदर्शन केले. तर, शिक्षकांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.

या बैठकीसाठी पेण पोलीस निरीक्षक संदिप बागुल, पोलीस निरिक्षक प्रसाद पांढरे, सहपोलीस निरीक्षक नागेश कदम, सहपोलीस निरीक्षक संतोष दराडे आदी उपस्थित होते.

Exit mobile version