उरणमध्ये शेकाप दहीहंडीचे आयोजन

| उरण | प्रतिनिधी |

राज्यात मंगळवारी (दि.27) सर्वत्र दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उरण तालुक्यातील गावोगावी पारंपारिक पद्धतीने दहीहंडी साजरा करण्याची पद्धत आहे. तसेच, शेतकरी कामगार पक्षातर्फे उरणमध्ये शेकाप रायगड जिल्हा खजिनदार प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या संकल्पनेतून भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाच, सहा आणि सात थर लावणाऱ्या गोविंदा पथकांना रोख पारितोषिक आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. पिरकोन येथील वाघेश्वर गोविंदा पथकाने गेल्या काही दिवसांमध्ये पोलिसांनी केलेल्या कामगिरीबद्दल पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चार थराची सलामी देऊन सन्मान दिला असून येथील दहीहंडी फोडण्याचा मान देखील पटकावला आहे.

यावेळी पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ, शेकाप रायगड जिल्हा खजिनदार प्रितम म्हात्रे, महादेव बंडा, नरेश घरत, एल.बी. पाटील, काका पाटील, रमाकांत पाटील, विकासशेठ नाईक, शेखर पाटील, सीमाताई घरत, रमाकांत म्हात्रे, रवी घरत तसेच शेकाप महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version